ऐकले का, कसाब आणि जिदांल भेटले

२६/११ हल्लाप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने दहशतवादी कसाब आणि अबू जिंदालची समोरासमोर बसून आज चौकशी केली. या चौकशीत कसाबनं अबू जिंदालला ओळखलं आणि जिंदालनेचहिंदी शिकवलं असल्याची कबुली दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2012, 10:42 AM IST

www.24taas.com, मुंबई
२६/११ हल्लाप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने दहशतवादी कसाब आणि अबू जिंदालची समोरासमोर बसून आज चौकशी केली. या चौकशीत कसाबनं अबू जिंदालला ओळखलं आणि जिंदालनेच आपल्याला हिंदी शिकवलं असल्याची कबुली दिली. आर्थर रोड जेलमध्ये क्राईम ब्रांचनं कसाब आणि अबू जिंदालची जवळपास दीड तास चौकशी केली.
दहशतवादी हल्ल्यादरम्यान कसाब आणि त्याच्या साथीदारांना पाकिस्तानवरून आदेश देणारा जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल आणि कसाब यांना आज आर्थर रोड कारागृहात आमने सामने आणण्यात आले. दोघांनी एकमेकांना ओळखून ‘सलाम आलेकूम... वालेकूम सलाम!’ केले.
जिंदालने केलेल्या धक्कादायक खुलाशांबाबत सायंकाळी उशिरापर्यंत क्राइम ब्रँचच्या अधिकार्यां कडून दोघांची दोन तास चौकशी सुरू होती. सौदी अरेबियाहून भारतात प्रत्यार्पण करून आणल्यानंतर अबू जिंदालचा ताबा मुंबई क्राइम ब्रँचकडे देण्यात आला. चौकशीदरम्यान जिंदालने भारतावर करण्यात येणाऱ्या संभाव्य हल्ल्यांबाबत धक्कादायक खुलासा केला.
कसाब आणि त्याच्या साथीदारांना हिंदी भाषा जिंदालनेच शिवकली. या सर्व बाबी उजेडात आल्यानंतर त्या पडताळून पाहण्यासाठी अबू जिंदालला कसाबसमोर नेण्यात येणार होते. याबाबत राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर दोघांना आमने सामने आणण्यात आले. आर्थर रोड कारागृहातील अंडासेलमध्ये अगदी मोजक्या अधिकार्यां च्या उपस्थितीत दोघांची ओळखपरेड करण्यात आली.
जिंदालच्या सहभागाबद्दल कसाबची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. मात्र, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x