मुंबई: औरंगाबादमध्ये सेना-भाजप युती होणारच अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी झी मीडियाला दिलेय. आज संध्याकाळपर्यंत युतीबाबत निर्णय होईल अशी माहिती दानवेंनी झी मीडियाला दिलीय.
औरंगाबादमधून पुढे आलेलं एमआयएमचं आव्हान आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रभाव यामुळं शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मागील अनेक दिवसांपासून दोन्ही महापालिका निवडणुकीत युती व्हावी यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. मात्र सर्व बैठका तोडग्याविनाच संपल्या मात्र आज झालेल्या बैठकीत भाजपर युतीसाठी अनुकूल असल्याची माहिती समोर येतेय.
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी येत्या २२ एप्रिलला दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार असून २३ एप्रिलला मजमोजणी होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.