सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकार खुशखबर घेऊन आलं आहे.

Updated: Apr 21, 2017, 09:21 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ  title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकार खुशखबर घेऊन आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ७ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२५ टक्क्यांवरून १३२ टक्के करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा १६ लाख अधिकारी आणि ६ लाख पेन्शनर्सना होणार आहे. १ जुलै २०१६ पासून हा भत्ता मिळणार आहे. याचबरोबर थकबाकीची रक्कम रोख स्वरुपात मिळणार आहे.