नौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2014, 03:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.
लेफ्टनंट कमांडर मनोरंजन कुमार, कपिश मुअल यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, या अपघाताची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे, नौदलाकडून सांगण्यात आले आहे.
अॅडमिरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याकडून या आगीची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार योग्य ती पाऊले उचलून पाणबुडीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल ४० सागरी मैल अंतरावर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. रशियन बनावटीची किलो क्‍लास वर्गातील ही पाणबुडी दुरुस्तीनंतर डिसेंबरमध्ये भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.