मुंबई : मुंबईतील शिवाजी नगर येथील पारसमणी ज्वेलर्स व मनी ट्रांसफर च्या दुकानात तीन अज्ञात इसमानी चाकूच्या धाक दाखवून २लाख ९३हजार रुपये लुटून आरोपी फरार झाले आहेत.
नरेंद्र पारसमणी यांच्या शिवाजी नगर येथे मनिट्रान्सफर चा व्यवसाय करतात.याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर पारसमणी आपल्या परिवारासह राहतात.आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास 3 इसमानी घराच्या छतावरून प्रवेश केला.
आरडाओरडा करू नये म्हणून पारसमणी यांच्यावर चाकूने वार सुद्धा केले तसेच त्यांच्या मुलांना मारण्याची धमकी दिली.आणि चावी दिली नाही म्हणून स्वतः जवळ असलेल्या हत्याराने कपाट तोडले आणि त्यात असलेले नगदी 2 लाख रुपये तसेच खाली असलेल्या दुकानात नेऊन तेथील 25 हजार रुपये आणि सोने चांदी चे दागिने घेऊन फरार झाले.
याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळताच पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक घटना स्थळी दाखल झाले .पोलीस पुढील तपास करत आहेत.चौकशी सुरु केली असून आरोपीचा शोध सुरु आल्याची माहिती पोलिसांनी दिली.