'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा

मुंबईच्या भोईवाडा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधील कर्मचाऱ्यांना चार भामट्यांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातलाय. हे चार चोर या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचं पेंडंट घेण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी हातचलखीनं शॉपमधील सोनं लंपास केलं. मात्र चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्या आधारे पोलिसांनी दोन चोरांना अटक केली.

Updated: Jul 27, 2014, 02:59 PM IST
'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा title=

मुंबई: मुंबईच्या भोईवाडा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधील कर्मचाऱ्यांना चार भामट्यांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातलाय. हे चार चोर या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचं पेंडंट घेण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी हातचलखीनं शॉपमधील सोनं लंपास केलं. मात्र चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्या आधारे पोलिसांनी दोन चोरांना अटक केली.

मुंबईतल्या भोईवाडा परीसरातील हे परमार ज्वेलर्स. ग्राहक बनून आलेल्या चार चोरांनी या दुकानातील तब्बल दहा लाख रुपयांचं सोनं अगदी शिताफीनं पळवलं. परमार दुकानात दोघंच आहेत याचा पुरेपुर फायदा या चार चोरांनी घेतला. चौघांपैकी दोन चोरांनी दुकानातील दोनही कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवलं आणि त्यांच्या दोन साथीदारांनी दुकानदाराची नजर चुकवून १० लाखांचं पेंडंट गायब केलं.

मात्र या चोरांची ही हातचलाखी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. चोरी झाल्याचं कळताच परमार यांनी तात्काळ पोलीस ठाण्या़त धाव घेतली आणि चोरांचे हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे निसार बिंदु आणि इजाज जाफरी या दोन चोरांना अटक केलीये आणि इतर दोन चोरांचा पोलीस शोध घेतायेत. दुकानातील सीसीटीव्ही कसा फायद्याचा ठरतो याचं हे उत्तम उदाहरण...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.