मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.

Updated: Jul 27, 2014, 09:10 AM IST
मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक title=

मुंबई: मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.

त्याऐवजी मानखुर्द आणि ठाणे-पनवेल य स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर आज मध्यरात्रीनंतर 12.50 ते सोमवारी पहाटे 4.50 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.