राणीच्या बागेत नवा पेंग्विन आणण्याचा अट्टाहास

मुंबईतल्या भायखळा इथल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Updated: Oct 24, 2016, 08:32 PM IST
राणीच्या बागेत नवा पेंग्विन आणण्याचा अट्टाहास  title=

मुंबई : मुंबईतल्या भायखळा इथल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मेलेल्या पेंग्विनच्या बदल्यात दुसरं पेंग्विन आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.

थायलंडच्या गोवा ट्रेड फार्मींग कंपनी या एजन्सीकडून तीन महिने केअर टेकींग कालावधी होता. तीन महिन्याच्या आतच एका पेंग्वीनचा जीव गेला. या पेंग्विनच्या बदली दुसरं पेंग्विन पाठवण्यासाठी राणीबाग प्रशासन गोवा ट्रेड फार्मिंग कंपनीला पत्र लिहीणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत नागरिकांसाठी पेंग्वीन दर्शन खुलं करण्याचा प्रयत्न आहे.