मुंबई : एप्रिल महिन्यापासून मुंबईकर आणि उपनगरांतील प्रवाशांच्या खिशावर जबरदस्त ताण पडणार आहे.
उद्यापासून रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही पाच रुपयांवरुन दहा रुपये होणार आहे. सेवाकराचा बोजा फर्स्टक्लासच्या पासवरही पडणार आहे.
शिवाय रेल्वेच्या तत्काळ तिकिटांची विक्री उद्यापासून प्रीमिअर स्तरावर होणार आहे. त्यानूसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के तिकिटे चढ्या दराने विकली जाणार आहेत.
तर, बेस्टची दुसरी दरवाढ ही उद्यापासून लागू होतेय. त्यानुसार बेस्टच्या तिकीटदरात टप्प्यानुसार एक ते दहा रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे बेस्टचं किमान भाडं सातवरुन आठ तर वातानुकूलित बसभाडं २५ वरुन ३० रुपये होणार आहे.
वांद्रे वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशालाही आज मध्यरात्रीपासून कात्री लागणार आहे. सी लिंक वरील टोलचे दर १५ टक्क्यांनी वाढणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.