राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी

राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, नुडल्स, बिस्कीट, केक, जाम, जेली, बर्फाचा गोळा, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी असणार आहे.

Updated: May 8, 2017, 11:37 PM IST
राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी title=

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, नुडल्स, बिस्कीट, केक, जाम, जेली, बर्फाचा गोळा, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी असणार आहे.

जंक फूडमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांची असणारी कमतरता आणि मीठ, साखर, मेदाचं असणारं अतिप्रमाण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि अन्य आजारांचं प्रमाण वाढत आहे. ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. जंक फूडची विक्री झाल्यास शाळा प्रशासन आणि संबंधित मुख्याध्यापक जबाबदार असतील. राज्य सरकारनं असा निर्णय जारी केला आहे.

जंक फूडच्या ऐवजी शाळांच्या उपहारगृहांमध्ये भाताचे विविध प्रकार, विविध पराठा, इडली, सांबर, वडा, दूध, दही, ताक, लस्सी असे दुग्धजन्य पदार्थ, नारळपाणी ठेवावे लागतील. पोषक पदार्थांचं सेवन केल्यानं होणा-या फायद्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे.