मराठी कलाकारही अणेंवर भडकले

वाढदिवसाच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी वाद ओढावून घेतला आहे. 

Updated: Apr 13, 2016, 11:05 PM IST
मराठी कलाकारही अणेंवर भडकले title=

मुंबई: वाढदिवसाच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी वाद ओढावून घेतला आहे. अणेंनी केलेल्या या असंवेदनशील वागण्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. 

दिग्दर्शक केदार शिंदे अणेंच्या या वागण्यावर चांगलेच भडकले आहेत. अणेंचे चार आणे कमी आहेत का ? राज्याचा तुकडा पाडणारा गेला उडत, असं ट्विट केदार शिंदेनं केलं आहे. तर केदार शिंदेचं हे ट्विट अभिनेता सिद्धार्थ जाधवनं रिट्विट केलं आहे.