लालबागच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, महिलेला श्रीमुखात भडकवली

मुंबईतला सगळ्यात प्रसिद्ध गणपती.... लालबागचा राजा.... जगभरातले भाविक बाप्पाचा दर्शनासाठी तासनतास रांगा लावतात...

Updated: Oct 2, 2012, 12:48 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतला सगळ्यात प्रसिद्ध गणपती.... लालबागचा राजा.... जगभरातले भाविक बाप्पाचा दर्शनासाठी तासनतास रांगा लावतात... पण यंदा भाविकांना अनुभवावा लागला तो मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शिविगाळ आणि मारहाण.... २७ सप्टेंबरला संध्याकाळी लालबागच्या राजाचा दर्शनासाठी उभ्या असलेल्या काही भाविकांची लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर बाचाबाची झाली.
त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलिसानं प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंडळाचा कार्यकर्ता उमेश जाधवने माणुसकीला लाज येईल असंच कृत्य केलं..लालबागच्या राजा मंडळाचा कार्यकर्ता उमेश जाधवने या महिला पोलीसाच्याच कानाखाली लगावली. भर गर्दीत महिला पोलिसावर हात उचलणा-या आरोपी उमेश जाधवला पोलिसांनी अटक केली.
पण नंतर त्याला १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हात उचलण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. या आधीही दर्शनावेळी अनेक महिलांची छेडछाड झाल्याची घटना घडलीय.