हेमा मालिनींना मुंबईत भूखंडांची खिरापत, कवडीमोल किमतीत

भाजप खासदार आणि ख्यातनाम सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर महाराष्ट्रातलं भाजप सरकार मेहरबान झालंय.. सरकारनं ओशिवरा येथील २ हजार चौरस मीटरचा भूखंड कवडीमोल भावानं हेमा मालिनींना बहाल करण्याचं ठरवले आहे.

Updated: Jan 29, 2016, 11:25 PM IST
हेमा मालिनींना मुंबईत भूखंडांची खिरापत, कवडीमोल किमतीत title=

मुंबई : भाजप खासदार आणि ख्यातनाम सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर महाराष्ट्रातलं भाजप सरकार मेहरबान झालंय.. सरकारनं ओशिवरा येथील २ हजार चौरस मीटरचा भूखंड कवडीमोल भावानं हेमा मालिनींना बहाल करण्याचं ठरवले आहे.

भगवान ही नही, जब सरकार भी देती है तो छप्पर फाडके, असच काहीसे ड्रीमगर्ल हेमा मालिनी बाबतीत झालेय. राज्यातलं भाजप सरकार सध्या हेमा मालिनीवर प्रसन्न झालंय. डान्स स्कूल सुरू करण्यासाठी हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार केंद्राला

राज्य सरकारनं तब्बल २ हजार चौरस मीटरचा भूखंड दिलाय. बाजारभावानं या भूखंडाची सध्याची किंमत आहे प्रति चौरस फूट ८ हजार रूपये... म्हणजेच सुमारे १७ कोटी रूपये. मात्र उद्यानासाठी राखीव असलेल्या या भूखंडासाठी प्रति चौरस मीटर केवळ ३५ रुपये एवढा दर सरकार आकारणाराय. म्हणजे फक्त ७० हजार रूपये. माहिती अधिकार कायद्याखाली हा धक्कादायक खुलासा झालाय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आलेय.

 
हेमा मालिनी यांच्यावरील या सरकारी कृपादृष्टीला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. हेमा मालिनीवर मेहरबानी केल्याचा आरोप सरकारला मात्र मान्य नाहीय. आपल्या मर्जीतल्या लोकांना कवडीमोल भावानं भूखंड देण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातही अनेकांना असं भूखंडाचं श्रीखंड वाटण्यात आलं होतं. सरकार बदललं तरी प्रवृत्ती काही बदलत नाही, अशी चर्चा रंगतेय.