मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. हॉटेल आणि रेल्वे स्थानकांवर पुढील दोन ते तीन महिन्यांत 26/11 प्रमाणे हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Updated: Apr 14, 2015, 11:17 AM IST
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता title=

मुंबई : मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. हॉटेल आणि रेल्वे स्थानकांवर पुढील दोन ते तीन महिन्यांत 26/11 प्रमाणे हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरवातीला लष्करे तैय्यब्बा दहशतवादी संघटनेचे पत्र गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहे.  यावरून गुप्तचर यंत्रणांनी सर्वच राज्यांना अलर्ट करत पुढील काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली आहे. 

या पत्रात आठ ते दहा दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत प्रवेश करून 26/11सारख्या हल्ल्याप्रमाणे लोकल रेल्वे स्थानके आणि हॉटेल्समध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.

गुप्तचर विभागाने याबाबतचा अलर्ट महाराष्ट्र पोलिस, सीआयडी, स्थानिक रेल्वे पोलिस आणि शहर पोलिसांना दिला आहे. 

लष्करे तैयबाचा कमांडर झकीउर रेहमान लख्वी याची पाकिस्तानमधील कारागृहातून सुटका झाली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.