बोगस रेल्वे तिकीट विकणाऱ्या टोळीचं बिंग फुटलं...

रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर रेल्वे प्रशासनाने तिकीट विक्रीचे परवाने दिले. मात्र, आता यामुळे रेल्वेच्या डोकेदुखीत वाढ झालीय. काही खासगी तिकीट केंद्रांवर बोगस तिकीटं विकणारी टोळी असल्याचं उघड झालंय.

Updated: Apr 13, 2015, 11:45 PM IST
बोगस रेल्वे तिकीट विकणाऱ्या टोळीचं बिंग फुटलं...  title=

मुंबई : रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर रेल्वे प्रशासनाने तिकीट विक्रीचे परवाने दिले. मात्र, आता यामुळे रेल्वेच्या डोकेदुखीत वाढ झालीय. काही खासगी तिकीट केंद्रांवर बोगस तिकीटं विकणारी टोळी असल्याचं उघड झालंय.

मुंबईत रेल्वे प्रवाशांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता रेल्वेने तिकीट खिडक्यांवरचा ताण कमी करण्यासाठी खासगी दुकानांत रेल्वे तिकीट वितरीत करण्याचं कंत्राट दिलं. पण, मुलुंडमध्ये साई रेल्वे तिकीट केंद्रावर बोगस उपनगरीय तिकीटं मिळत असल्याच उघड झालंय.

पोलिसांनी एक प्रिंटर, संगणक, तिकीट प्रिंट करण्याची सामग्री जप्त केलीय. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय. दिवसाला हजारो प्रवासी या केंद्रावरून तिकीटं घेतात. त्यामुळे आत्तापर्यंत किती बोगस तिकीटं वितरीत झाली आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती झोन ७ चे डीसीपी डॉ. विनय राठोड यांनी दिलीय.  

ही बोगस तिकीटं मूळ तिकीटांसारखीच हुबेहूब होती. त्यामुळे तिकीट कलेक्टरलाही त्यातला फरक जाणवत नव्हता. या बोगस तिकिटांमुळे रेल्वेला लाखो रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजनाही रेल्वेला आवरती घ्यावी लागते की काय अशी चिन्ह आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.