www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एलबीटीला व्यापा-यांचा विरोध कायम आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या बैठकीनंतरही व्यापारी असमाधानी आहेत. मुजोर व्यापाऱ्यांचा हेका कायम असल्याने राज्य सरकार पेचात आहे.
व्यापारी बैठकीत एलबीटीबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत व्यापा-यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. व्हॅटवर अधिभार लावून कर वसूल करा, अशी व्यापा-यांची मागणी आहे. ही समिती चर्चा करुन 1 महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहे.
मात्र समितीच्या निर्णयानंतर न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा व्यापा-यांनी दिलाय.. त्यामुळं एलबीटीचा तिढा कायम असून राज्यातल्या जनतेवर एलबीटी बंदची टांगती तलवार कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.