पाहा: हे १२ टोलनाके कायमचे बंद झाले

१ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके पूर्णपणे बंद होणार आहे. तर ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. त्यामुळं एकूण ६५ टोलनाक्यांपासून सामान्य नागरिकाची सुटका होणार आहे.  

Updated: Apr 10, 2015, 03:14 PM IST
पाहा: हे १२ टोलनाके कायमचे बंद झाले title=

मुंबई : १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके पूर्णपणे बंद होणार आहे. तर ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. त्यामुळं एकूण ६५ टोलनाक्यांपासून सामान्य नागरिकाची सुटका होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केलीय. आज विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी युती सरकारची ही मोठी घोषणा आहे. 

पीडब्ल्यूडीचे ११  टोलनाके बंद करण्यासाठी सरकार २२६.५१ कोटी देणार तर एमएसआरडीसीचा तडाली टोलनाका बंद करण्यासाठी सरकार १६८ कोटी देणार

 पाहा कोणते १२ टोलनाके पूर्णपणे बंद होणार आहेत ते -

 १) अलिबाग - पेण - खोपोली - वडवळ - ४.२९ कोटी

 २) शिक्रापूर - ४४.३३ कोटी

 ३) मोहोळ - ११.३८ कोटी

 ४) भंडारा - २३.९४ कोटी

 ५) कुसळब - ४२ कोटी

 ६) अकोले - १७.६८ कोटी

७) ढकांबे  

८) नांदुरी  -      }  २०.५६ कोटी

९) सप्तश्रुंगी 

१०) तापी पूल - ३५.३६ कोटी

११) रावणटेकडी - २७ कोटी

१२) तडाली टोल नाका - १६८ कोटी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.