अपडेट 07.00 PM
मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी करण्यात आलीय, लालबागच्या राजाची मिरवणूक दिमाखात सुरू आहे. पुण्यातही मानाच्या पहिल्या पाच गणपतीचं हौदात विसर्जन करण्यात आलं, पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरील गणपती बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन केले, यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. मुंबईत गिरगावात विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तटरक्षक दलाकडून गिरगावात चौफेर गस्त सुरू आहे.
मुंबई: पुणे, मुंबईसह राज्यभरात बाप्पाला आज वाजत-गाजत निरोप देण्यात येतोय. दुष्काळामुळं पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं यंदा हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीची तयारी पूर्ण झालीय. रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत आहेत.
तर मुंबईत गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात झालीय. विसर्जनासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलीय. तब्बल ३५ हजार पोलीस सुरक्षेसाठी रस्त्यावर आहेत. विसर्जनासाठी आज रविवारचा लोकलचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. तर रस्ते मार्गातही बदल करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.