मुंबई- एका महिन्यात महाराष्ट्रात भगवी दिवाळी साजरी करणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. भाजपला अखेरचा प्रस्ताव आणि फॉर्म्युला शिवसेनेनं दिलाय. भाजपला ११९ पूर्ण जागा लढता याव्यात म्हणून ९ ज्यादा जागा आपल्या कोट्यातून देण्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. यानुसार आता शिवसेना १५१, भाजप ११९ आणि इतर घटक पक्ष १८ जागा अशा हा फॉर्म्युला आहे.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
मुंबई- रंगशारदा इथं उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू
एका महिन्यात भगवी दिवाळी साजरी करू
जबाबदारीला जागूनच निर्णय घेणार
यंदा सत्ता मिळवणारच, आदेश पाळण्याची शिवसेनेची प्रथा
शिवसेनाप्रमुखांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करा
मी नुसतं बोललो नाही, करून दाखवलं
राज्याचा विकास करायचाय, मला जनतेसाठी सत्ता हवी
याद्या तयार कोणत्याही क्षणी जाहीर करू शकतो
निवडणूक तोंडावर आली असतांना, चर्चा सुरू हे दुर्दैव
उद्धव ठाकरेंनी दाखवलं 'विकासाचं इंद्रधनुष्य'
शिक्षण, आरोग्य, ग्राम विकासाचं व्हिजन डॉक्युमेंट
सेनेचा महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा
हायटेक प्रचारासाठी शिवसेना सज्ज
य़ुती तुटल्य़ास मला दु:ख
हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी खूप भोगलं
मला भाजपचे उणे-दुणे काढायचे नाही
महाराष्ट्राच्या महिलेला सर्वोच्च पदावर बसवलं, याचा अभिमान
युती राहावी ही माझी मनापासून इच्छा आहे
युती खूर्चीसाठी नाही, हिंदुत्वासाठी
गोध्रानंतर मोदींसाठी बाळासाहेबांनी दिला होता पाठिंबा
तुम्ही देणारे नाही, घेणार आहेत - उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
मी चुकत असेल, तर तोंडावर बोला...
शिवसेनेला कस्पटासमान समजू नका
शिवरायांचा, बाळासाहेबांचा आशिर्वाद असेल, तर सत्ता आम्हालांच मिळेल
आपल्या अस्तित्त्वाची लढाई आहे, युती टिको-तुटो
युती टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
सत्तेपेक्षा मला शिवसैनिक प्रिय - उद्धव
शिवसेनेचा भाजपला अखेरचा प्रस्ताव
तुमच्या सर्वांसाठी मी आणखी एक पाऊल मागे जातोय - उद्धव
आज दिल्लीतल्या नेत्यांशी बोललो, शेवटचा प्रस्ताव
शिवसेना - १५१, भाजप- ११९ घटक पक्षांसाठी शिवसेना - १८ जागा सोडणार
हा शेवटचा प्रस्ताव, जबाबदारी मोठी, निर्णयाचा चेंडू भाजपच्या कोर्टात
विजय आपलाच आहे, विश्वास ठेवा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.