मुंबई : वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी अनेकजणांना चारपाच लोकल सोडून द्याव्या लागतात. यावर आता एम-इंडिकेटरनं प्रवाशांना दिलासा दिलाय.
आता एम-इंडिकेटरवर गर्दी कमी असलेल्या लोकलची माहित उपलब्ध होईल. २६ जानेवारीपासून लोकलचं वेळापत्रक बदललं. यानंतर एम-इंडिकेटरनं रेल्वे प्रवशांना कमी गर्दी असणा-या लोकलची माहिती उपल्बध करुन दिली आहे.
सध्या एम-इंडिकेटरवर पश्चिम रेल्वेवरील कमी गर्दीच्या लोकलची माहिती उपलब्ध करुन दिली जातेय. आता सोमवारपासून मध्य रेल्वेवर ही माहिती उपलब्ध होईल. एम-इंडिकेटर अॅपमध्ये विशिष्ट हिरव्या रंगात लोकलच्या वेळेपुढे दाखवण्यात येईल.