मुंबईच्या महालक्ष्मी कारशेडमध्ये आग

मुंबई आणि परिसरामध्ये आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत.

Updated: Jan 30, 2016, 04:47 PM IST
मुंबईच्या महालक्ष्मी कारशेडमध्ये आग title=

मुंबई: मुंबई आणि परिसरामध्ये आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यातच आता महालक्ष्मी कारशेडमध्ये आग लागली आहे. या आगीचा धुर लोअर परळ स्टेशनपर्यंत पोहोचला आहे.

ही आग कशामुळे लागली याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पण आधीच देवनारमध्ये कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे काही भागांमध्ये मोठा धूर पसरला आहे. त्यातच आता महालक्ष्मी कारशेडमध्ये लागलेल्या आगीनं इथल्या परिसरातही धूर पसरला आहे.