मॅगीच्या रिपोर्टमुळे धकधक गर्ल माधुरी अस्वस्थ

 मॅगी बाबत आलेल्या बातम्या आणि रिपोर्टमुळे अवस्वस्थ झाली. त्यानंतर मी नेस्लेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे धकधक गर्ल माधुरीने ट्विटरद्वारे सांगितले आहे. 

Updated: May 31, 2015, 03:53 PM IST
मॅगीच्या रिपोर्टमुळे धकधक गर्ल माधुरी अस्वस्थ title=

मुंबई :  मॅगी बाबत आलेल्या बातम्या आणि रिपोर्टमुळे अवस्वस्थ झाली. त्यानंतर मी नेस्लेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे धकधक गर्ल माधुरीने ट्विटरद्वारे सांगितले आहे. 

माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

या बाबत ट्विट करताना म्हटले की, मी नेस्लेच्या अधिकाऱ्यांना भेटली. त्यांनी मला आश्वस्त केले की मॅगीच्या गुणवत्तेसंबधी आणि सुरक्षेविषयी अधिकारी वैयक्तिक काळजी घेतात. 
ग्राहकांना नेस्ले नेहमी प्राधान्य देतात. त्यामुळे उच्च गुणवत्ता मानकांच्या येथे नेहमी निकष लावला जातो. 

भारतीयांप्रमाणे अनेक वर्षांपासून मीही मॅगी न्यूडल्सचा आस्वाद घेते. पण मॅगीबाबत आलेल्या रिपोर्टनंतर मी अस्वस्थ झाली आणि नेस्लेच्या अधिकाऱ्यांना भेटली, असल्याचेही माधुरीने या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.