मुंबईकरांनो, उद्या 'महा'मेगाब्लॉक बरं का!

मध्य रेल्वे मार्गावर दिवा इथल्या कट-कनेक्शनच्या कामासाठी घेण्यात येणारा दहा तासांचा पहिला महा-मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे.

Updated: Sep 17, 2016, 11:24 AM IST
मुंबईकरांनो, उद्या 'महा'मेगाब्लॉक बरं का! title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर दिवा इथल्या कट-कनेक्शनच्या कामासाठी घेण्यात येणारा दहा तासांचा पहिला महा-मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे.

दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यासाठी रविवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत हा महा-मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या ब्लॉक दरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरील प्रवाशांचे हाल होणार आहेत.

सकाळी ८.३० ते सकाळी ९.३० आणि संध्याकाळी ५.३० ते ७ या दरम्यान डाऊन धीमी मार्गिका पूर्णपणे बंद राहील तर सकाळी ९.३० ते ५.३० या काळात डाऊन धीम्या लोकल दिवा स्थानकापासून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

सकाळी ८ ते ९.३० वाजता आणि संध्याकाळी ५.३० ते ७ या काळात कळवा आणि मुंब्रा स्थानकांमध्ये कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल बंद राहणार आहेत. 

या 'महा'मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यात आलीय. या कामासाठी एकूण ४ ब्लॉक घेण्यात येणार असून पुढील ब्लॉक १५ दिवसानंतर घेण्यात येईल.