मुंबई : महानंद डेअरीच्या घोटाळ्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय.
भूम तालुका दूध संघाला नियम डावलून 65 लाख रुपये देताना नियम डावलल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. याप्रकरणी 2009 मधील तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त सल्लागारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
2009च्या सुमारास निवडणुका होत्या त्यामुळं हा पैसा नेमका कुठ वापरला गेला असा सवाल करण्यात आलाय. कारण महानंदनं दूध संघाला पैसे दिले खरे मात्र दुधाचा एक थेंबदेखील महानंदाला देण्यात आलेला नाही.