मुंबई : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांचा महासागर लोटला आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत.
यासाठी शिवाजी पार्कवर ८८ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर भव्य मंडप उभारण्यात आलाय. त्याशिवाय १२ निरीक्षण रस्ते, 5 भव्य एलईडी स्क्रीन, 5 प्लाझ्मा टीव्ही, 45 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात आहेत. अनुयायांची कुठलीही गैरसोय होवू नये यासाठी पोलिस आणि महानगर पालिका प्रशासनाने चोख व्यवस्था करण्यात आलीये.
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर आज कुठलाही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशाच्या वेगवेगळ्या भागातून येणा-या अनुयायांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. तर बेस्ट प्रशासनाकडूनदेखील आज ३५ जादा बसेसची सोय करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.