मुंबई : मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईत लवकरत ताज्या आणि स्वस्त भाज्या मिळणार आहेत. त्यासाठी सरकारनं नवी आयडिया लढवलीय.
टॉमेटो ८० रुपये किलो
बटाटे ३० रुपये किलो
कांदे ३५ ते ४० रुपये किलो
हे आकडे दिवसेंदिवस वाढत चाललेत. या सुटत चाललेल्या महागाईला शेपमध्ये आणण्यासाठी सरकारला नवी आयडिया सुचलीय. आता भाजी विकणाऱ्यांना सरकार अनुदान देणार आहे. त्यामुळे मुंबईत भरपूर भाजीही येणार आहे आणि ती स्वस्तही मिळणार आहे.
त्यासाठी भाजीवाल्यांना थेट शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करणं आणि ती थेट ग्राहकांना विकणं बंधनकारक आहे. ही अट पूर्ण झाली तर सरकार संबंधित भाजीवाल्याला पन्नास टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर ४० टक्क्यांनी घटतील, असा सरकारचा दावा आहे.
सरकारची भाजी विकण्याची ही नवी आयडिया प्रत्यक्षात आली तर मुंबईच्या आसपासच्या भागातले पावणे दोन लाख शेतकरी या योजनेशी जोडले जाणार आहेत आणि त्यांचा फायदाही होणार आहे.
सरकारचा ‘फिफ्टी-फिफ्टी व्हेज फॉर्म्युला’
भाजीविक्रेत्यांना याच शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करावी लागणार आहे. जर भाजीचा ठेला टाकायचा असेल तर ३० हजारांच्या गुंतवणूकीवर १५ हजारांचं अनुदान मिळणार आहे. एखाद्या गाडीमधून भाजी विकायची असेल तर ४ लाखांच्या गुंतवणुकीवर २ लाखांचं अनुदान मिळणार आहे. तर एसी गाडीमध्ये भाजी विकायची असेल तर १० लाख गुंतवणुकीवर ४ लाखांचं अनुदान मिळणार आहे. सरकारचा हा नवा ‘फिफ्टी-फिफ्टी व्हेज फॉर्म्युला’ खरंच प्रत्यक्षात आला तर भाजी विकणाऱ्यांना, भाजी पिकवणाऱ्यांना आणि भाजी खाणा-यांनाही अच्छे दिन येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.