गुड न्यूज: आता पासपोर्ट काढणं होणार आणखी सोप्प!

आता पासपोर्ट काढणं आणखी सोपं होणार आहे... पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशनचा वेळ कमी लागावा यासाठी मुंबई पोलिसांनी 'पोलीस व्हेरिफिकेशन एसएमएस' ही नवी सुविधा सुरू केलीय. 

Updated: Jul 24, 2014, 08:31 PM IST
गुड न्यूज: आता पासपोर्ट काढणं होणार आणखी सोप्प! title=

मुंबई: आता पासपोर्ट काढणं आणखी सोपं होणार आहे... पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशनचा वेळ कमी लागावा यासाठी मुंबई पोलिसांनी 'पोलीस व्हेरिफिकेशन एसएमएस' ही नवी सुविधा सुरू केलीय. 

या सुविधेनुसार पासपोर्ट ऑफिसमधून ज्यावेळी तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये येईल, त्यावेळी तुम्हाला एसएमएस येईल. त्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनसाठीची तारीख आणि वेळ या एसएमएसमधून तुम्हाला कळवली जाईल. 

व्हेरिफिकेशन पूर्ण होताच तुमचा फॉर्म पासपोर्ट ऑफिसला कोणत्या तारखेला पाठवला गेला आणि किती वाजता हे सुद्धा एसएमएसमधून कळेल आणि हे सगळं ऑनलाईनसुद्धा चेक करता येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.