www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी संजय दत्त यास 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पत्नी मान्यता हिच्या आजाराचे कारण देऊन ही रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, आजारी असणारी मान्यता कार्यक्रमात कशी काय उपस्थित राहाते? यामुळे संजय दत्तची रजा वादात सापडली. त्यामुळे याप्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांनी टार्गेट करण्यात आल्याने त्यांनी अधिक माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई बाँबस्फोट प्रकरणात संजय दत्त दोषी ठरला. त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांने आधी शिक्षा भोगली असल्याने त्याची शिक्षा कमी झालेय. मात्र, असे असताना त्याला याआधी संचित (पॅरोल) रजा मिळाली होती. आता पुन्हा एकदा ३० दिवसांची रजा मिळाली. ही रजा मंजूर करण्यात आल्याने सगळीकडून टीका करण्यात येत आहे. याची दखल घेत आर. आर. पाटील यांनी याविषयी चौकशी करून, सभागृहात निवेदन देणार असल्याचे आज सांगितले.
विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दत्त याच्या पॅरोल अर्जावर स्वाक्षरी केली. या संदर्भातील आदेश कारागृह प्रशासनास पाठविला. संजयची पत्नी मान्यता आजारी असल्यामुळे त्याने पॅरोलचा अर्ज केला होता. पोलिसांनी तो मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता.
मात्र, अनेक त्रुटी असल्याने तो मंजूर करावा की नाही, याचा स्पष्ट अभिप्राय द्यावा, असे सांगत देशमुख यांनी हा अर्ज पुन्हा मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठविला होता. त्यामुळे तीन ते चार महिन्यांपासून त्यावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, दिवाळीपूर्वी दत्त यास १५ दिवसांची अभिवाचन रजा (फर्लो) मंजूर केली होती. त्यात पुन्हा वाढ केली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात गेला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ