12 वाईनची टेस्ट पडली महाग. गमवावा लागला जीव

12 वेगवेगळ्या वाईनची टेस्ट घेणं एका व्यक्तीला महाग पडलंय. या वाईन्सची टेस्ट घेतल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. 

Updated: Jan 22, 2016, 11:52 PM IST
12 वाईनची टेस्ट पडली महाग. गमवावा लागला जीव title=

मुंबई : 12 वेगवेगळ्या वाईनची टेस्ट घेणं एका व्यक्तीला महाग पडलंय. या वाईन्सची टेस्ट घेतल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईच्या खारमध्ये येल्लो बार ऑल डे मधील पुर्खीमयुम अख्तर हुसैननं या वाईन टेस्ट केल्या, आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

पुर्खीमयूमनं एका वाईन टेस्टिंग वर्कशॉपमध्ये भाग घेतला. तिकडे त्यानं 10 वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन टेस्ट केल्या. वर्कशॉप बंद झाल्यावर त्यानं आणखी एक फुल ग्लास वाईन घेतली अशी माहिती पुर्खीमयूमच्या मित्रानं दिली. 

पुर्खीमयूम नशेत दिसून आल्यावर येल्लो बार ऑल डेच्या सुरक्षा रक्षकांनी ही माहिती मॅनेजरला दिली, त्यानंतर मॅनेजर तिकडे आला आणि पुर्खीमयूमला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

याप्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण अजूनही पुर्खीमयूमचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही. रासायनिक प्रक्रियेमुळे पुर्खिमयूमच्या शरिरात विष तयार झालं, ज्यात त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज फॉरेन्सिक अधिका-यांनी वर्तवला आहे.