मुंबई : राज्यात मराठा मोर्चाचं वादळ सुरू असतानाच, कोपर्डीच्या घटनेनंतर सर्वात पहिला बंद पुकारणाऱ्या संजीव भोर पाटील यांना सहा जिल्ह्यात प्रवेश बंदी का करू नये, याविषयी कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय.
संजीव भोर पाटील यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही नोटीस देण्यात आलीय. पुणे, सोलापूर, बीड, अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये संजीव भोर यांच्या उपस्थितीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो.
राज्यातल्या मराठा मोर्चांच्या मागे संजीव भोर यांचीच प्रेरणा असल्याचं बोललं जातं. अहमदनगर जिल्ह्याच्या सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी ही कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
दरम्यान अशा नोटीसा बजावून आंदोलन चिरडता येणार नाही असा इशारा संजीव भोर यांनी फेसबुकद्वारे दिलाय.