मराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात; मनसेचीही उडी

उत्तर मुंबईतल्या दहिसरमधल्या एका इमारतीमधील मराठी-अमराठी वाद चांगलाच पेटलाय. राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्यानं परसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Updated: Jul 18, 2015, 08:54 PM IST
मराठी-अमराठी वाद : आव्हाड पोलीस ठाण्यात; मनसेचीही उडी title=

मुंबई : उत्तर मुंबईतल्या दहिसरमधल्या एका इमारतीमधील मराठी-अमराठी वाद चांगलाच पेटलाय. राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्यानं परसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

वादग्रस्त इमारतीला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड संध्याकाळी आले होते. त्यांना कांदिवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन नंतर त्यांना पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणी सहा आरोपींची 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका करण्यात आलीय.


मनसेचीही वादात उडी

दरम्यान, दहिसर येथील शाकाहारी-मांसाहारी वादात आता मनसेनंही उडी घेतलीय. याप्रकरणी मनसे नेत्यांनीगोविन्द चव्हाण कुटुंबियांची भेट घेत आपण त्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय. तसंच जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हापासून गुजराती समाजाची दादागिरी वाढत असल्याचं मतही मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी व्यक्त केलं. याबाबत राज ठाकरे येत्या दोन दिवसांत भूमिका मांडणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.