मुंबई : मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडकडून राणेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये नारायण राणेंच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे राणेंची समजूत काढण्यासाठी ज्ञानेश्वरी बंगल्यावर गेले होते.
राजीनामा मागे घेण्याची विनंती माणिकरांनी राणेंना केली. मुख्यमंत्री, राणे आणि माणिकरावांमध्ये पुन्हा बैठक होणार आहे.
नारायण राणे यांना देण्यात आलेला शब्द काँग्रेस हायकमांडनं पाळला नाही. पण राणे यांनी मात्र आपला शब्द खरा करून दाखवला.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.