मुंबई : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढतेय म्हणून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३६ हजार ३०६ दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी झाला आहे.
तरीही मुंबईला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. मात्र कडक उन्हाळा आणि बाष्पीभवनामुळे तसेच पावसाळा लांबला तर मोठं पाणीसंकट उभं राहण्याची चिन्हं आहेत.
हे संकट वाढलं तर भविष्यातील राखीव पाणीसाठ्यावर अवलंबून रहावं लागणार आहे, तसं हे संकट दरवर्षीच असतं, यामुळे मुंबईल पाणी पुरवठा करणारा आणखी एक तलाव असावा असंही म्हटलं जातंय.
मात्र भविष्यातील पाणीसाठा वापरण्याची वेळ आली तर, मुंबईत पाणीकपात करावी लागेल, असं पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.