मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

रविवार असल्यानं मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Updated: Jul 31, 2016, 09:09 AM IST
मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : रविवार असल्यानं मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

हार्बर लाईनला छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी माहीम डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर अप आणि डाऊन मार्गावर माहीम आणि अंधेरी दर्म्यान 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.