मेकर्स टॉवरची आग नियंत्रणात, २ दगावल्याची भीती

कफ परेडच्या मेकर्स टॉवरची आग नियंत्रणात आली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या टॉवरच्या २० व्या मजल्यावर आग लागली होती. या टॉवरमध्ये बहुतेक उद्योजकांची घरं आहेत.

Updated: Oct 18, 2016, 09:17 AM IST
मेकर्स टॉवरची आग नियंत्रणात, २ दगावल्याची भीती title=

मुंबई : कफ परेडच्या मेकर्स टॉवरची आग नियंत्रणात आली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या टॉवरच्या २० व्या मजल्यावर आग लागली होती. या टॉवरमध्ये बहुतेक उद्योजकांची घरं आहेत.

ज्यांच्या मृत्यू बद्दल भीती व्यक्त करण्यात येत आहेत, ते बजाज यांच्याकडे नोकरीला असल्याचं सांगण्यात येत आहे, ही प्राथमिक माहिती आङे. बजाज कुटूंबियांना वाचवताना हे दोन जण होरपळले गेल्याचं सांगण्यात येत आहे.

बजाज कुटुंबातील सर्व जण सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. वाचवताना होरपळलेल्या दोन जणांविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.