मुंबई : मनोरुग्ण पत्नीनं पतीच्या डोक्यात धारदार हत्यारानं वार करत त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी गोवंडी इथं घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
गोवंडीच्या इंडियन ऑइल नगर इथं मृत देबासीस सेन (५६) हे त्यांच्या ४९ वर्षीय पत्नीसह राहतात. पत्नीला पाच वर्षांपासून स्क्रिझोफेनिया हा मानसिक आजार असल्यानं त्यांनी तिच्यावर उपचार सुरू होते. अधूनमधून तिला झटके येत असल्यानं देबासीस तिला एकटीला सोडून कुठंही बाहेर जात नव्हते.
सोमवारी सकाळी देखील दोघंही झोपलेले असताना या महिलेला अचानक झटका आला. या वेळी तिनं घरातील लोखंडी रॉडनं पतीवर हल्ला केला. देबासीस यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातांवर गंभीर जखमा झाल्यानं त्यांचा घरातच मृत्यू झाला. काही वेळानंतर याच परिसरात राहणारी त्यांची मोठी मुलगी घरी परतली. तिच्या हा प्रकार लक्षात येताच तिनं देबासीस यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र दाखल करण्यापूर्वी ते मृत झाल्याचं इथल्या डॉक्टरांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.