मुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा

एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे. 

Updated: Jul 7, 2014, 11:29 AM IST
मुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा title=

मुंबई : एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे. 

एमएमआरडीएनं मेट्रोच्या दरवाढीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी आहे. 

२०१२ पासून प्रलंबित असलेल्या हकीम समितीच्या शिफारसी नुसार राज्य सरकारने मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाड लागू केलीय. पण ही भाडेवाड प्रलंबित होती. 

अखेर शासनाने ही भाडेवाढ लागू केलीये. त्यानुसार रिक्षा १५ रुपये वरुन १७ रुपये आणि टॅक्सी १९ रुपये वरुन २१ रुपये होणार आहे. ही भाडेवाढ १० जुलैपासून लागू होणार आहे. 

या भाडेवाढीला मुंबई ग्राहक पंचायतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारा आवाहन केलं आहे. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी असून हायकोर्ट रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ संदर्भात महत्वपूर्ण निकाल देऊ शकते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.