www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`म्हाडा`ची 2014 घरांची सोडत आता 15 जून रोजी होणार आहे. तर सहा मे पासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे.
म्हाडाची घरे मुंबईत 814 तर विरार आणि वेंगुर्ला येथे एकूण 1827 असून दोन्ही मिळून एकूण 2641 घरांचा त्यात समावेश आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिल रोजी सुरू होत होत आहे. 6 मेपासून तुम्ही ऑनलाईन नोंदणी करु शकता.
मुंबईतील 814 घरांमध्ये उच्च उत्पन्न गटातील 245 घरांचा, मध्यम उत्पन्न गटातील 65घरांचा, विनोबा भावे नगर कुर्ला येथील 207 घरांचा तर अत्यल्प उत्पन्न गटातील 297 घरांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 16 लाख 26 हजार 500 पासून सुरू होते. तर दहिसर येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत तब्बल 80 लाख 98 हजार 500 रुपये आहे.
कोकण मंडळाने विरार येथील 1716 घरांची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील 111 घरांची जाहिरात काढली आहे. विरार येथे 1116 घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत. तर 600 घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत. वेंगुल्र्यात 40 घरे अल्प उत्पन्न गटातील, 59 घरे मध्यम उत्पन्न गटातील तर12 घरे उच्च उत्पन्न गटातील आहेत. कोकण मंडळातर्फे काढण्यात आलेल्या घरांची किंमत 11 लाख 85 हजारांपासून ते 50 लाख 21 हजार 614 रुपयांपर्यंत आहे.
6 मे रोजी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. 30 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल केल्यानंतर अनामत रक्कम भरण्याची मुदत 2 जूनपर्यंत आहे. अधिक माहिती `म्हाडा`च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.