मुंबई: शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज अचानक बंडाचा पवित्रा घेतलाय. राज्यमंत्रीमंडळातली धुसफूस या निमित्तानं समोर आलीय.
राठोड फडणवीस सरकारवर नाराज आहेत. राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नसल्याची त्यांची तक्रार आहे. राठोड यांनी आपली ही भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून व्यक्त केलीय.
भाजपचं मंत्रिमंडळ आम्हाला काम करू देत नाही, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी हा आरोप केला असून हीच परिस्थिती कायम राहिली तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत राठोड असल्याची माहिती मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.