नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.

Updated: Jan 5, 2016, 12:50 PM IST
नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.

मुलुंडमध्ये आपल्या नव्या कोऱ्या 'ह्युन्डाई आय टेन' या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे ही गाडी बिल्डिंगच्या आवाराच्या बाहेर जाऊन थेट रस्त्यावर जाऊन एका दुसऱ्या गाडीला धडकली. उल्लेखनीय म्हणजे, ही गाडी एका आमदाराची होती.

आमदार अशोक पाटील यांच्या गाडीवर ही गाडी आदळली... त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कठडयांवर जाऊन ही गाडी धडकली. या अपघातात आमदार बचावले असले तरी त्यांचे सहकारी मात्र जखमी झालेत. 

हा अपघात इतका तीव्र होता की दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान पोलिसांनी विभास झा यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे, काल दुपारीच विभासनं आपल्या नवी गाडी आपल्या घरी आणली होती.