मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
यावेळी बोलतांना नारायण राणेंविरोधात लढत राहणार, असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय. आपली लढाई राणे व्यक्ती नाही तर त्या प्रवृत्ती विषयी आहे, असंही ते म्हणाले. पराभव झाला तरीही राणेंच्या प्रवृत्तीत बदल नाही.
आगामी आठ दिवसांत आमदारकीचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं केसरकरांनी जाहीर केलंय.
केसरकर नारायण राणे यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. केसरकर स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून नारायण राणे यांना त्यांचा विरोध आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार असल्यानं पुन्हा राणे यांचा प्रचार करावा लागू नये म्हणून केसरकर यांनी ही भूमिका घेतलीय.
केसरकरांनी आज मुंबईत सुनील तटकरेंची भेट घेऊन आपला राजीनामा दिलाय. गुरुपौर्णिमेला केसरकरांनी मांडखोल येथे कार्यकर्त्याची सभा घेतली या सभेत काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत आग्रह धरला. मात्र एक गट मात्र सेनेत जाण्यास तयार नसल्याचं समजतंय. यात राष्ट्रवादीचे माजी जिल्ह्याध्यक्ष बाळा भिसे, माजी आमदार पुष्पसेन सावंत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा समावेश आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.