मुंबई : राज्यात दुष्काळ असताना आणि राज्य आर्थिकदृष्या अडचणीत असताना आमदारांसाठी मात्र खुशखबर आहे.
आमदारांना दरमहा पन्नास हजार रुपये निवास भत्ता देण्याचा निर्णय घेण्यासाठी उद्या विधानभवनात बैठक होत आहे.
तसंच आमदारांना वाहन खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या १० लाख रुपये बिनव्याजी कर्जाची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेतला जाणार आहे.
एकीकडे दुष्काळात पिचलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला सरकारला निधी कमी पडत आहे. तर दुसरीकडे महिन्याला ७५ हजार रुपये वेतन आणि भत्ते मिळणाऱ्या आमदारांना आता ५० हजार रुपये अतिरिक्त निवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.