मुंबई : उत्तर मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथल्या पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाजवळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. परिसरात बेकायदेशीरपणे धंदा करणाऱ्या फेरिवाल्यांविरोधातलं हे आंदोलन होतं.
यावेळी परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाणही केली गेली. विशेष म्हणजे अनधिकृत फेरीवाल्यांबाबत स्थानिकांनी पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र दोन्ही सरकारी यंत्रणांनी तक्रारीकडे दुर्लक्षच केलं होतं. त्यामुळे अखेर मनसेनं आपल्या स्टाईलनं हे आंदोलन केले.
मुंबई शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशी फेरीवाले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हाच प्रकार जोगेश्वरी भागात सुरु होता. याबाबत तक्रारी करुन सुद्धा कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे मनसेने हे आंदोलन अचानकपणे तीव्र केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.