मनसेची दादरमध्ये निवडणूक समारोप प्रचार सभा

शिवसेनेनं दादरमधील दत्ता राऊळ मैदानावरचा हक्क न सोडल्याने अखेर मनसेची प्रचाराच्या समारोपाची सभा कबुतरखाना जावळे मार्गावर होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2017, 12:33 PM IST
मनसेची दादरमध्ये निवडणूक समारोप प्रचार सभा  title=

मुंबई : शिवसेनेनं दादरमधील दत्ता राऊळ मैदानावरचा हक्क न सोडल्याने अखेर मनसेची प्रचाराच्या समारोपाची सभा कबुतरखाना जावळे मार्गावर होणार आहे.

दत्ता राऊळ मैदानावर सभा घेण्यासाठी शिवसेना मनसे आमने-सामने  आली होती. उद्या मनसेच्या प्रचाराची समारोपाची सभा दादर दत्ता राऊळ मैदानावर घेण्यासाठी मनसे आग्रही होती. मात्र शिवसेनेच्या दादरमधील स्थनिक पदाधिकाऱ्यांनी मनसे आधीच मैदान सभेसाठी आरक्षित केले होते. 

शिवसेनेची प्रचाराची सभा bkc मैदानावर होत असल्याने दत्ता राऊळ मैदान सोडण्याची मनसेने मागणी केली होती. प्रसंगी प्रभादेवी 'सामना' कार्यालयाबाहेर सभा घेण्याचा इशारा दिला होता. 

मात्र शिवसेनेने मैदानावरचा हक्क सोडण्यास नकार  दिला. त्यामुळे दादर रेल्वे स्थानक, कबुतरखाना हे केंद्रीय ठिकाण असल्याने सभेसाठी योग्य जागा असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे मत ठरल्यामुळे ही जागा आता सभेसाठी मनसेने नक्की केली आहे.