मनसेचे आमदार तेराचे झाले अकरा...

काही वर्षापूर्वीच उद्यास आलेल्या मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाने अल्पावधीतच महाराष्ट्रातील त्यांचे स्थान काय आहे हे दाखवून दिलं होतं.

Updated: Jan 10, 2013, 01:51 PM IST

www.24taas.com, मुंबई
काही वर्षापूर्वीच उद्यास आलेल्या मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाने अल्पावधीतच महाराष्ट्रातील त्यांचे स्थान काय आहे हे दाखवून दिलं होतं.... त्यामुळे विधानसभेत राज ठाकरेंच्या पक्षाने तब्बल १३ जागांवर मनसेचा झेंडा फडकवला होता.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवणाऱ्य़ा मनसेच्या आमदारांची संख्या वर्षागणिक कमी-कमी होताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं १३ जागांवर विजय मिळवला होता. २०११ मध्ये खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादीत गेल्या.

पोटनिवडणुकीत मनसेनं तटस्थ भूमिका घेतली आणि भाजपचा विजय झाला. त्यामुळं मनसेची संख्या १२वर आली. त्यानंतर आता कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं पक्षाच्या आमदारांची संख्या ११ पर्यंत खाली आली आहे.