www.24taas.com, मुंबई
मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
२५ टक्के पाण्याची बचत करत हे पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावं, असं मनसे नगरसेवक संदिप देंशपाडे यांनी मागणी केली आहे. होळी आणि रंगपंचमीला लाखो लिटर पाणी पाण्याची नासाडी होते. त्यामुळे पाण्याची बचत होईल असा दावा संदिप देंशपाडेंनी केला आहे.
मनसेने दुष्काळाच्या मुद्द्यावर चांगलचं रान उठवलेलं असताना मुंबईत होळीच्या दिवशी पाणीकपात करून ते पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्याची मागणी केल्याने मनसेच्या या मागणी आता महापालिका काय निर्णय देते याकडे मनसेचे लक्ष लागून राहिले आहे.