‘मोनो’नं चार महिन्यांत केली ४४ लाखांची कमाई!

तिसरी लाईफ लाईन बनलेल्या मोनो रेलला मुंबईकरांनी स्वीकारलंय. पहिल्या चार आठवड्यात मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीस उतरलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2014, 09:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तिसरी लाईफ लाईन बनलेल्या मोनो रेलला मुंबईकरांनी स्वीकारलंय. पहिल्या चार आठवड्यात मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीस उतरलीय.
गेल्या चार आठवड्यांत साडे चार लाखांहून अधिक प्रवाशांनी मोनो रेलमधून प्रवासाचा आनंद लुटल्याचं समोर आलंय. त्यामुळं मोनोरेलच्या तिकीट विक्रीतून तब्बल ४४ लाख रुपयांचं उत्पन्न प्रशासनाला मिळालंय.
प्रवाशांच्या संख्येचा उतरता आलेख
यापैंकी, पहिल्या आठवड्यात जवळपास दीड लाख प्रवाशांनी मोनोरेलमधून प्रवास केला. तर दुसऱ्या आठवड्यात ही संख्या थोडी घटली आणि हाच आकडा दुसऱ्या आठवड्यात सव्वाल लाखांवर पोहचलेला.
तिसऱ्या आठवड्यात मात्र केवळ एक लाख, १२ हजार, ८०९ मोनोरेलच्या प्रवासाचा आनंद घेतला. चौथ्या आठवड्यात हीच संख्या ९२ हजार ७७१ प्रवाशांवर पोहचली.
आकड्यांच्या आलेखावर नजर टाकली तर मोनोरेलच्या प्रवाशांची संख्या प्रत्येक आठवड्यात कमी झालेलीही दिसून येईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.