मुंबई : हवामान खात्यानं येत्या 2 दिवसांत राज्यभरात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये आजपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झालीय.
हवामान खात्यानं येत्या 2 दिवसांत मुसळधार पाऊस सांगितल्यानं, मुंबईत आणि राज्यातील जनतेला सतर्क रहावं लागणार आहे.
अजित पवारांकडून हवामान खात्याची फिरकी
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच हवामान खात्याची फिरकी घेतली आहे.
हवामान खातं सांगतं तेव्हा नेमका पाऊस येत नाही, आणि हवामान खात्यानं वातावरण कोरडं सांगितलं तर पाऊस येतो, अशी फिरकी अजित पवारांनी घेतलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.