प्रत्येक आईला असा मुलगा असावा

आईनं मुलाला जन्म द्यावा, हा झाला निसर्गनियम... पण गुंडेचा कुटुंबियांवर अचानक असा प्रसंग ओढवला की, मुलालाच आपल्या आईला नवा जन्म द्यावा लागला. काय घडलं नेमकं

Updated: Jun 29, 2014, 05:42 PM IST
प्रत्येक आईला असा मुलगा असावा title=

मुंबई : आईनं मुलाला जन्म द्यावा, हा झाला निसर्गनियम... पण गुंडेचा कुटुंबियांवर अचानक असा प्रसंग ओढवला की, मुलालाच आपल्या आईला नवा जन्म द्यावा लागला. काय घडलं नेमकं

या आहेत गुणवंती गुंडेचा. महिनाभरापूर्वी त्यांची लिव्हर ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया झाली. 49 वर्षीय गुणवंतीबाईंना सध्या आपले आसू अनावर झालेत, कारण त्यांना त्यांच्या मुलानं दिलंय नवं जीवनदान.

दीड महिन्यापूर्वी गुणवंती यांना कावीळ झाली. त्यावेळी त्यांचं लीवर खराब असल्याचं समजलं. 
उपचारासाठी त्यांना पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्यांची तब्बेत बिघडतच होती. शेवटी त्या कोमात गेल्या. त्य़ांना तातडीने मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. 

गुणवंतीबाईंचं लीव्हर फेल झालं होतं. 24 तासात त्यांचं लीव्हर ट्रांसप्लांट करायचं होतं. त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून आला तो पोटचा मुलगा धीरज.

क्षणाचाही विचार न करता त्यानं आपलं लीव्हर देण्याचा निर्णय घेतला. 

लगेचच त्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि 29 मे रोजी 24 तासात त्यांच्यावर लीव्हर ट्रांसप्लांट सर्जरी यशस्वीरित्या पार पडली. 

धीरजच्या आईला वाचवण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी धीरजच्या लिव्हरचा उजवा भाग काढला. आता धीरजकडे लीव्हरचा केवळ डावा भाग उरलाय. 

पुढील तीन महिन्यात डाव्या बाजूचं लीव्हर मोठं होऊन उजव्या बाजूपर्यंत पोहचेल. मात्र, तोपर्यंत धीरजला सकस आहार घेऊन, प्रकृतीला कोणतीही बाधा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. 

धीरजने लीवर दिलं नसतं तर त्याच्या आईचे प्राण डॉक्टरही वाचवू शकले नसते. पण अशा लीव्हर ट्रांसप्लांट सर्जरी आता सहजशक्य असल्या तरी त्या यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असल्याचं डॉक्टर सांगतात.

दरवर्षी जवळपास 2 लाख पेशंट लीव्हर फेल झाल्यामुळे मरण पावतात

वर्षाला 25 ते 30 हजार लीव्हर ट्रांसप्लांट शस्त्रक्रीयेची गरज असते. 

पण अशा केवळ 1000 शस्त्रक्रीया होतात. 

लीव्हर ट्रांसप्लांटसाठी मृत व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तीचे लीव्हर ट्रांसप्लांट करता येते.

आईमुळेच जीवनदान मिळतं हे खरंय... पण एका मुलानंच आपल्या आईला जीवनदान दिल्याची ही अनोखी घटना आहे. धीरजनं आपल्या आईचे प्राण वाचवून हे जीवन सार्थकी लावलं असंच म्हणावं लागेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.