राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, राज ठाकरेंविरोधात लढणार?

स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावं लागलं. त्यानंतर तिनं शनिवारी रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.

Updated: Jun 29, 2014, 09:24 AM IST
राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, राज ठाकरेंविरोधात लढणार? title=

मुंबई : स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावं लागलं. त्यानंतर तिनं शनिवारी रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आपण रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढविणार आहोत, असं अभिनेत्री राखी सावंतनं शनिवारी जाहीर केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा असून, महिलांची सुरक्षा आणि गरीब, दलित उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचं ती म्हणाली.

'राष्ट्रीय आम पक्षा'तर्फे राखीनं मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढवली होती. मात्र तिथं तिचा दारूण पराभव झाला. त्यानंतर तिनं रिपाइंत प्रवेश केला.

राखी सावंतला पक्षाच्या महिला आघाडीचं अखिल भारतीय कार्याध्यक्षपद देण्यात आलं. विधानसभा निवडणुकीत त्या आमच्या पक्षाच्या स्टार प्रचारक असतील, असं आठवले यांनी सांगितलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.